book

Shri Vitthalsahasranaam Stotra Bhashya : Ek Abhyas (श्रीविठ्ठऱसहस्रनामस्तोत्र भाष्य : एक विवेचन)

  • TypePrint
  • CategoryNon-Academic
  • Sub CategoryFiction
  • StreamLanguage and Literature

श्रुती, स्मृती, पुराणे ही भारतीय समाजाची पुरातन ग्रंथसंपदा आहे. ही संपदा आपल्या ऋषीमुनींनी सुदीर्घ अशा परिश्रमांच्या बळावर संपादित केली आहे. या साहित्यामध्ये मानबाच्या इह-परलोकीच्या कल्याणार्थ विचार केला गेला आहे. वैदिक वाङ्‌मयाप्रमाणेच पुराणवाड्‌मयदेखील समृद्ध आहे. मुख्य पुराणांची संख्या अठरा आहे. या मुख्य अठरा पुराणांमध्ये श्लोकांच्या संख्येच्या दृष्टीने स्कंदपुराणानंतर येणारे पुराण म्हणजे पद्मपुराण होय. या पुराणाच्या उत्तरार्धातील बाराहसंहितेत आलेल्या पांडुरंगमाहात्म्यामध्ये विठ्ठलदेवतेवरील सहस्रनामस्तोत्र आहे. या स्तोत्राबर श्री. चंद्रशेखरमहाराज देगलूरकरांनी संस्कृतमध्ये भाष्य लिहून मराठी अनुबाद केलेला आहे. संस्कृतकवींच्या काव्यसृष्टीची निर्मिती ही स्तुतिरूपातच झाली आहे. विश्वसाहित्याचा आदिग्रंथ असणाऱ्या ऋग्वेदामध्ये देवतांच्या स्तुतींवर आधारित सूक्तांचा संग्रह आहे. स्तोत्रसाहित्याचा उत्तरोत्तर विकास पाहताना वेदसूक्तांचे महत्व नाकरता येणार नाही. स्तोत्र फक्त भक्ती, पूजा यासाठीच नाही तर विषयांची वैविध्यता हे ही स्तोत्रांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आराध्याच्या अनंत गुणांच्या माहात्म्याचं वर्णन, प्रार्थनेचं निवेदन हे स्तोत्रांचं वैशिष्ट्य. संस्कृत स्तोत्रांमध्ये भारतीय संस्कृतीचे वास्तविक रूप, धर्म, विचार परंपरा यांचा इतिहास सामावलेला आहे. संस्कृतमधील स्तोत्ररचना ही विविध विषयाशी निगडित दिसून येते. उदा. क्षमा, प्रार्थना, शरणागतिप्रार्थना, स्तुती, अपराधक्षमापण इ. आणि असे हे स्तुतीवर आधारित काव्य है पंचक, षट्पदी, सप्तक, अष्टक, नवक, दशक, द्वादशी, पंचदशी, षोडशी, विंशती, चत्वारिंशत्, पञ्चशिका, सहस्रनाम इ. रूपात लिहिल्या गेले. उपरोक्त स्तोत्रप्रकारांमध्ये असलेली सहस्रनामस्तोत्रावली ही भक्तिसाधनपरंपरेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र, ललितासहस्रनामस्तोत्र, श्रीव्यंकटेशसहस्रनामस्तोत्र इ. सहस्रनामांची यादी ही अतिशय मोठी आहे. त्यामधील पंढरपुरस्थित विठ्ठल देवतेवर आधारित श्रीविठ्ठलसहस्रनामस्तोत्र हे पद्मपुराणामधील उत्तराखंड बाराहसंहितेत आहे. हे स्तोत्र समाजाभिमुख नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकप्रियतेमुळे आणि बारकरी समाजाचे अधिष्ठान ही देवता असल्यामुळे या स्तोत्राचा आणि त्यावरील श्री. चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांनी लिहिलेल्या संस्कृतभाष्याचा सर्वतोपरी अभ्यास होणे गरजेचे भासते. प्रस्तुत शोधप्रबंधाच्या माध्यमातून या विषयाचे परिशीलन करण्यात आलेले आहे. स्तोत्रवाङ्‌मयाची व्याप्ती लक्षात घेता, अजून पुष्कळशी स्तोत्रसंपदा ही अप्रकाशितच आहे, जनमानसापर्यंत ती पोहोचलेलीच नाही, त्यामुळे अशा दुर्मीळ स्तोत्रांच्या अभ्यासहेतूने या विषयावर मी अभ्यास केला आहे. जेणेकरून महाराष्ट्राच्या आराध्यदेवतेस जीवन समजून वाटचाल करणारा वारकरी संप्रदाय हा या स्तोत्राच्या परिचय व अभ्यास माध्यमाने या देवतेच्या आणखी जवळ जाऊ शकेल. हा विचार करूनच पद्मपुराणांतर्गत श्रीविठ्ठलसहस्रनामावरील या भाष्याचा अभ्यास या विषयावर मी संशोधन केले आहे. व ते संशोधन आज ग्रंथस्वरूपात आकार घेते आहे. प‌द्म‌पुराणांतर्गत श्री श्रीविठ्ठलसहस्रनामस्तोत्रावर ह. भ. प.श्री. चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांनी संस्कृतमध्ये जे भाष्य लिहिले त्या भाष्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने 'श्रीविठ्ठलसहस्रनामस्तोत्र एक चिंतन' अशी या ग्रंथाची शीर्षकनिश्चिती झाली. हा ग्रंथ पूर्ण होण्यासाठी मला माझ्या कुटुंबाचे योगदान, माझे गुरुवर्य आचार्य सत्यकाम पाठक यांचे मोलाचे सहकार्य तसेच माझ्या सद्‌गुरूंची मा. मुकुंद पुराणिक यांची कृपा लाभली. तसेच मा. राजेशमहाराज देगलूरकर (मुक्ताई प्रतिष्ठानचे सचिव) व प्राचार्य डॉ. विजय पांडुरंग कुलकर्णी यांचे विषयी मी कृतज्ञता व्यक्त करते.

Buy From
IIP Store ₹ 344
Amazon ₹ 430
Flipkart ₹ 430

**Note: IIP Store is the best place to buy books published by Iterative International Publishers. Price at IIP Store is always less than Amazon, Amazon Kindle, and Flipkart.

Book Title Shri Vitthalsahasranaam Stotra Bhashya : Ek Abhyas (श्रीविठ्ठऱसहस्रनामस्तोत्र भाष्य : एक विवेचन)
Author(s) Dr. Sanjivani Shripad Nerkar
ISBN 978-93-7020-913-8
Book Language Hindi
Published Date April, 2025
Total Pages 154
Book Size 7x10 Standard
Paper Quality 75 GSM NORMAL PAPER
Book Edition First

COMMENTS

    No Review found for book with Book title. Shri Vitthalsahasranaam Stotra Bhashya : Ek Abhyas (श्रीविठ्ठऱसहस्रनामस्तोत्र भाष्य : एक विवेचन)

LEAVE A Comment

Related Books

BHAVABIMBA
BHAVABIMBA..
  • IIP1870,
  • Print
₹ 176 ₹ 220
Add to cart
ONCE UPON A GENDER IDEOLOGY: A STUDY OF SELECTED FAIRY TALES VIS-À-VIS MOVIE ADAPTATIONS AND MODERN RETELLINGS
ONCE UPON A GEN..
  • IIP1887,
  • Print
₹ 240 ₹ 300
Add to cart
OMMATIDIUM SURVIVAL IN THE AGE OF ALGORITHMS
OMMATIDIUM SURV..
  • IIP1924,
  • Print
₹ 1024 ₹ 1280
Add to cart