Basic Information

नमस्कार, मी, मनोज श्रीधर धामणकर. मूळ गांव, मु. पो. भगूर ता. जि. नाशिक सध्या वास्तव्यास पुणे. सर्वप्रथम, माझे सर्वस्व तीर्थरुप 'आण्णा' त्याग ह्या शब्दाला दुसरा पर्यायी शब्द म्हणजे माझी' आई' समजदार ही गोष्ट उपजत जर कोणाला मिळाली असेल असे माझे वडिलबंधू, समाधानाची व्याख्या जिने लहानपणीच आत्मसात केली अशी माझी बहीण, हे लिखाण करण्याची ज्यांनी मला ताकद दिली ते सर्व शिक्षकवृंद आणि ही कलाकृती तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी ज्यांनी मला प्रेरित केलं.. ते माझं गाव, सर्व गावकरी, माझे सर्व जिवलग मित्र.. आणि माझ्या लिखाणाचा मध्यबिंदू असं व्यक्तिमत्व (माझ्यासाठी) म्हणजे ' योग्या' यांना ही प्रथम आवृत्ती अतिशय नम्रपणे समर्पित करतो... 'चांदोबा' हे ज्याचं आवडतं मासिक होतं असा मी... शालेय जिवन संपता संपता कधी ग्रामिण लेखकांच्या प्रेमात पडलो मलाच कळलं नाही. त्यात प्रामुख्याने शंकर पाटील, आण्णाभाऊ साठे अशा लेखकांच्या कांदबऱ्या, कथासंग्रह त्याचबरोबर सर्वात आवडते लेखक' पु.ल. आणि व. पु. 'यांचे लिखाण मी तारुण्यात बऱ्यापैकी वाचलं आणि आत्मसात केलं.. त्यांच्या लिखाणाची शैली, त्यांची रचना बांधणी ह्यला भारावून कधीतरी आपणही लिखाण करावं असं मनाशी ठरवून कधीतरी काहीतरी लिहण्याचा प्रयत्न करत होतो..कोव्हीड च्या दिवसात स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी ह्या माझ्या सुप्त इच्छेला मी पुनः जागृत केलं आणि लिहायला सुरुवात केली.. आणि पुनः भूतकाळात रमत रमत भरपूर लिखाण झालं.. त्यात प्रामुख्याने बालपण ते तारुण्या चा प्रवास. वास्तव्यास देशात कुठे ही जरी असलो तरी मला गावची ओढ काही स्वस्त बसू देत नव्हती... त्यामुळे जे जे आठवलं ते सर्व काल्पनिक न ठेवता वस्तुस्थिती ला अनुसरून जसचं तसं मांडण्याचा प्रयत्न केलाय.. ह्यातील सर्व पात्र ही काल्पनिक नसून खरी आहेत.. आयुष्याच्या आत्ता पर्यंतच्च्या प्रवासात कुठे ना कुठे भेटलेली.. त्यांच्या स्वभावच्या विविध छटा प्रसांगाला अनुसरून मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.. त्यामुळे मनुष्य स्वभावाप्रमाणे साहजिकच कुठे काही शब्दफेक जर चुकीची वाटली कोणाला तर त्यांची मी सर्वप्रथम क्षमा मागतो.. केवळ विनोद व वास्तविकतेचा पदर धरून केलेलं लिखाण अधिक जिवंत वाटावं हाच काय तो माझा प्रामाणिक हेतू आहे.. आपण सर्व ह्या प्रवासाचे साक्षीदार व्हाल हिच काय ती शुल्लक अपेक्षा... शेवटी एकचं म्हणावंसं वाटतं.. " स्वप्नप्रत वाटणाऱ्या ह्या प्रवासात माझ्या एकट्याचा हिस्सा नाही कसं म्हणू शकतो आपण की मी कुणाचाच ऋणी नाही " आपला म. श्री.. धा...

WhatsApp Button